अमित शहांनी लालकृष्ण अडवाणींचा विक्रम मोडला
भूषविले सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद

नवी दिल्ली/5 ऑगस्ट : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. सर्वाधिक काळ देशाचे गृहमंत्रीपद भूषविण्यच्या विक्रमाची शाह यांच्या नावे नोंद झाली आहे. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा सर्वाधिक काळ गृहमंत्री म्हणून विक्रम मोडला आहे. याच पोर्शभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाहांचे कौतुक केले आहे. मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळात 30 मे 2019 रोजी शहा यांनी गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. शहा यांनी गृहमंत्री म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ 9 जून 2024 रोजी पूर्ण केला. 10 जून 2024 रोजी ते पुन्हा गृहमंत्री झाले आणि तेव्हापासून ते या पदावर आहेत. माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत 19 मार्च 1998 ते 22 मे 2004 पर्यंत एकूण 2 हजार 256 दिवस गृहमंत्रीपद भुषवले. अडवाणींनंतर काँग्रेस नेते गोविंद वल्लभ पंत हे सर्वाधिक काळ गृहमंत्री राहिलेले तिसरे आहेत.सरदार वल्लभभाई पटेल हे 1 हजार 218 दिवस देशाचे गृहमंत्री राहिले. योगायोगाने, शहा यांनी 5 ऑगस्ट रोजी सर्वात जास्त काळ गृहमंत्री राहण्याचा पराक्रम केला. गृहमंत्रालया व्यतिरिक्त अमित शाह देशाचे पहिले सहकार मंत्री देखील आहेत. यापूर्वी शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गुजरातचे गृहमंत्री राहिले आहेत. अमित शाह यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेतले. शाह यांनी 2019 मध्ये याच दिवशी त्यांनी संसदेत जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याची घोषणा केली.




