अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारतीय वस्त्रोद्योग अडचणीत

पंतप्रधान मात्र गप्प, राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली/23 जानेवारी : अमेरिकेने भारतीय वस्त्रोद्योगावर लादलेल्या 50 टक्के आयात शुल्कामुळे देशातील वस्त्रोद्योग निर्यातदारांवर गंभीर संकट ओढवले आहे. मात्र या गंभीर मुद्द्यावर देशाचे पंतप्रधान गप्प बसून आहेत, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला. रोजगार गमावणे, कारखाने बंद पडणे आणि निर्यात ऑर्डरमध्ये मोठी घट होत असल्याचेही राहुल गांधींनी नमूद केले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर राहुल गांधी यांनी सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर तीव्र शब्दांत टीका करत तिला ‘डेड इकॉनॉमी’ असे संबोधले. वस्त्रोद्योगाशी संबंधित सुमारे 4.5 कोटी रोजगार आणि लाखो छोटे-मोठे उद्योग धोक्यात असल्याचा इशाराही त्यांनी दिला. अमेरिकेच्या टॅरिफमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा थेट फटका भारतीय निर्यातदारांना बसत असून सरकारकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गंभीर विषयावर अद्याप मौन बाळगले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उद्योग संकटात असताना सरकारने टॅरिफबाबत ना कोणती ठोस भूमिका मांडली, ना निर्यातदारांसाठी मदत पॅकेज जाहीर केले, नोकर्‍या जात आहेत, कारखाने बंद पडत आहेत आणि निर्यातदारांचे ऑर्डर बुक कमी होत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button