दहशतवादी उमरला आश्रय देणारा आरोपीला अटक

नवी दिल्ली/26 नोव्हेंबर -लाल किल्ला स्फोट प्रकरणात एनआ यएने आणखी एका आरो पीला अटक केली आहे. हरिया णाच्या फरीदा बाद जिल्ह्यातील धौज परिसरातील रहिवासी शोएब अहमद हा सातव्या आरोपी म्हणून या प्रकरणात अटक करण्यात आला आहे. एनआयएच्या माहितीनुसार, शोएबने या स्फोटापूर्वी मुख्य आरोपी दहशतवादी उमर उन नबीला सुरक्षित आश्रय दिला आणि आवश्यक लॉजिस्टिकल सपोर्ट उपलब्ध करून मदत केली. एनआयएने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, या प्रकरणातील सहा प्रमुख आरोपी आधीच अटकेत आहेत. शोएबच्या अटकेमुळे तपासाची व्याप्ती आता अधिक वाढली आहे. एजन्सीच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, शोएबने उमरला फक्त आश्रय दिला नाही, तर त्याला स्फोटके पोहोचवण्यास, सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यास आणि पळून जाण्यासही मदत केली. त्याचे स्थान आणि कॉल डिटेल्स तपासल्यावर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button