दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत अभाविपने 4 पैकी 3 जागा जिंकल्या
आर्यन मान अध्यक्ष

* एनएसयुआयला उपाध्यक्षपदाची मिळाली संधी
नवी दिल्ली /19 सप्टेंबर – दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने यंदाच्या निवडणुकीत तीन प्रमुख पदांवर विजय मिळवत पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. तर काँग्रेसप्रणीत राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (छडणख) ने उपाध्यक्ष पदावर बाजी मारली आहे. मतमोजणीचा कार्यक्रम उत्तर दिल्लीतील विद्यापीठ क्रीडा संकुलातील मल्टीपर्पज हॉलमध्ये सकाळी आठ वाजता सुरू झाला. एकूण 19 फेर्यांनंतर संध्याकाळी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत अइतझच्या आर्यन मन्न यांनी 26,642 मते मिळवत छडणखच्या जोस्लीन चौधरी यांचा 15,828 मतांनी दणदणीत पराभव केला. विशेष म्हणजे, जोस्लीन चौधरी या छडणखकडून 17 वर्षांनंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार्या महिला उमेदवार होत्या, त्यामुळे ही लढत अधिकच लक्षवेधी ठरली होती. उपाध्यक्षपदासाठी छडणखच्या राहुल झांसला यांनी 27,182 मते मिळवत अइतझचे गोविंद तन्वर यांना 8,037 मतांनी पराभूत केले. या विजयामुळे छडणखने अइतझच्या वर्चस्वात अंशतः खंड पाडण्यास यश मिळवले आहे. इतझने मात्र इतर दोन पदांवर आपली पकड कायम राखली आहे. सचिवपदासाठी अइतझचे कुणाल चौधरी यांनी 21,944 मते मिळवत कबीर यांचा 6,957 मतांनी पराभव केला. तर संयुक्त सचिवपदासाठी दीपिका झा यांनी 20,254 मते मिळवत लवकुश भडाना यांच्यावर 4,284 मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. यंदाच्या निवडणुकीसाठी विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली सुरू होत्या. उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मीडिया, प्रत्यक्ष भेटीगाठी आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन यांचा प्रभावी वापर केला. विद्यार्थ्यांमध्येही उत्साह दिसून आला होता. निवडणुकीचा निकाल पाहता अइतझने पुन्हा एकदा आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली असून छडणखलाही काही अंशी यश मिळाले आहे. आता नव्या पदाधिकार्यांकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले जाईल, अशी अपेक्षा विद्यापीठ परिसरातून व्यक्त होत आहे.




