जागावाटपात उदारमतवादी भूमिका घ्यायला हवी होती

काँग्रेसने आत्मपरीक्षण करणे गरजेचे

बिहार निवडणुकीवर पृथ्वीराज चव्हाण यांचा पक्षाला घरचा आहेर

सल्लागारांच्या निर्णय क्षमतेवर गंभीर प्रश्न

पटना /16 नोव्हेंबर – बिहार निवडणुकीचे निकाल देशभरात चर्चेचा विषय ठरत असताना काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळ, चुकीचे अंदाज आणि अपयशी रणनीती यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट बोट ठेवले आहे. पीटीआयशी बोलताना चव्हाण यांनी पक्षाला आरसा दाखवणारे वक्तव्य केले असून, त्यांनी काँग्रेस सल्लागारांच्या निर्णयक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मी बिहारला गेलो नाही, पण संपूर्ण राज्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही,असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या निवडणूक तयारीतील दोष उघडपणे मांडले. त्यांच्या मते, काँग्रेसने स्वतःचे मूल्यमापन न करता चुकीच्या आकड्यांवर आणि चुकीच्या सल्लागारांवर विसंबून संधी दडवली. चव्हाण यांनी स्पष्ट सांगितले की काँग्रेसच्या सल्लागारांनी दिलेले अंदाज वास्तवापासून दूर होते. आपल्याकडे 19 जागा होत्या, त्या 21 किंवा 22 झाल्या असत्या, अगदी 17-18 झाले असते तरी ठीक, पण निवडक 30 जागा लढल्या असत्या आणि राजदला 40 जागा देण्याची भूमिका घ्यायला हवी होती. त्यांच्या मते, जागावाटपात उदारमतवादी भूमिका घेतली असती तर जास्त जागा मिळू शकल्या असत्या. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मी संपूर्ण बिहार निवडणूक पाहत आहे, पण मी बिहारला गेलो नाही, त्यामुळे संपूर्ण राज्याबद्दल बोलणे माझ्यासाठी योग्य ठरणार नाही. मी काँग्रेस पक्षाबद्दल काहीतरी सांगू शकतो, तेही, जे मी थोडं पाहिलं आहे. आपण काँग्रेस पक्षाचे आत्मपरीक्षण करत आहोत. जेव्हा जेव्हा विचारांची लढाई असते,

पराभवावर काय म्हणाले?

काँग्रेस पक्षाचे आत्मपरीक्षण करत असल्यानं आपण लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा विचारांची लढाई असते तेव्हा ती एक-दोन दिवसात संपत नसते. महात्मा गांधींना त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी ,किंवा आंबेडकरांना त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी खूप वेळ लागला हे . तो काळ देशाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा होता. विचारांची लढाई खूप वेदनादायक असते. चढ-उतार असतात. याचं मूल्यांकन करताना मला एक गोष्ट वाटते की, दूरवरून, काँग्रेस पक्षाचे सल्लागार जे मतांचे आरक्षण करत होते, त्यांनी कदाचित योग्य आकडे दिले नसतील.

संबंधित बातम्या

Back to top button