फक्त तीन महिन्यांत 767 शेतकर्यांच्या आत्महत्या
महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या प्रश्नां वर राहुल गांधी आक्रमक

नवी दिल्ली/3 जुलै-शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत बुडत असून,सरकार त्यांच्या दुरवस्थेबाबत पूर्णपणे उदासीन आहे. सरकारने शेतकर्यांच्या कर्जमाफी आणि पिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देण्याच्या कायदेशीर हमीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे, अशा शब्दांतमध्ये लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज (दि. 3 जुलै) महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी अधिकृत एक्स (द) पोस्टमध्ये् लिहिले की, महाराष्ट्रामध्ये तीन महिन्यांत 767 शेतकर्यांनी आत्महत्या केली, पण सरकार यावर शांत आहे. हा केवळ एक आकडा आहे का? ही 767 कुटुंबं आता कधीही सावरू शकणार नाहीत. एका दैनिकाच्या- रिपोर्टचा अहवालाचा संदर्भ देत त्यांनी लिहिले की, शेतकरी दररोज कर्जाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. बियाणे महाग, खते महाग, डिझेल महाग, पण एमएसपीची कोणतीही हमी नाही. जेव्हा ते कर्जमाफीची मागणी करतात, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, त्यांची कर्जे मोदी सरकार सहज माफ करते.मोदीजी म्हणाले होते, शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करू, पण आज परिस्थिती अशी आहे की अन्नदात्याचे आयुष्यच संपत चालले आहे. ही व्यवस्था शेतकर्यांचा जीव घेत आहे आणि मोदीजी आपल्या प्रसिद्धीचा (पीआर) तमाशा पाहत आहेत. अशी बोचरी टीकाही राहुल गांधी यांनी केला आहे.




