स्फोटाच्या कटात 20 जणांचा सहभाग

‘डॉक्टर मॉड्यूल’चा देशव्यापी दहशतवादी कट उघड

* मौलवींकडून डॉक्टरांचा ब्रेनवॉश

* 3,000 किलो स्फोटक सामग्री जप्त

नवी दिल्ली/12 नोव्हेंबर : रेड फोर्टजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटामागे कार्यरत असलेल्या जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असलेल्या डॉक्टर टेरर मॉड्यूल च्या संदर्भात एकूण पंधरा व्यक्तींना अटक करण्यात आली आहे आणि तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या 15 जणांना अटक केली असून, आतापर्यंत 56 डॉक्टरांची चौकशी करण्यात आली आहे.
या मॉड्यूलचा तपास श्रीनगरमधील एका आक्षेपार्ह पोस्टर प्रकरणापासून सुरू झाला, ज्यात सुरक्षा दलांना धमक्या देण्यात आल्या होत्या. चौकशीच्या पहिल्या टप्प्यात शोपियाँमधील मौलवी इरफान अहमद वाघ आणि गांदरबलमधील जमीर अहमद यांना अटक करण्यात आली. यानंतर 5 नोव्हेंबरला सहारनपूरमधून डॉ. आदिलला अटक करण्यात आली.
या तपासादरम्यान फरीदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटी दहशतवादी मॉड्यूलचे ऑपरेशनल केंद्र असल्याचे उघड झाले. डॉ. मुजम्मिलला अटक केल्यानंतर 2,563 किलो स्फोटके अल फलाह मशिदीचे इमाम हाफिज मोहम्मद इश्तियाक यांच्या घरातून जप्त करण्यात आली. एकूण सुमारे 3,000 किलो स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, या कारवाई दरम्यान, अल फलाह युनिव्हर्सिटीचा कर्मचारी आणि कथित मॉड्यूल सदस्य डॉ. उमर मोहम्मद भूमिगत झाला. 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटात डॉ. उमर मोहम्मदचा कापलेला हात आढळला असून, तो आत्मघाती हल्लेखोर असल्याचा संशय आहे. या पुष्टीकरणासाठी त्याच्या आईच्या डीएनए नमुन्यांची तपासणी केली जात आहे. स्फोटातील कार डॉ. शाहीन शाहीद हिच्या नावाने नोंदणीकृत होती, ज्याना नंतर लखनऊमधून अटक करण्यात आली. जैश-ए-मोहम्मदच्या भारतातील कारवायांची प्रमुख म्हणून तिची ओळख पटली आहे.

डॉ. उमर मोहम्मद भूमिगत

दिल्ली स्फोटाच्या चौकशीत फरीदाबादच्या अल-फलाह मेडिकल कॉलेजमधील वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. निसार-उल-हसन याचे नाव समोर आले, जेव्हा एनआयएने विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची आणि कर्मचार्‍यांची सखोल चौकशी सुरू केली. काश्मिरी वंशाचे हे डॉक्टर पूर्वी श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक होते. जिथे त्याला 2023 मध्ये देशविरोधी कारवायांच्या संशयावरून काढून टाकण्यात आले होते. दिल्ली स्फोटानंतर निसार अचानक गायब झाला, बेपत्ता निसारचा सध्या देशभर शोध सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button