धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात 19 कामगार अडकले

नवी दिल्ली /31 ऑगस्ट  : उत्तराखंडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. पिथोरागडमधील धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या सामान्य आणि आपत्कालीन बोगद्यांमध्ये भूस्खलन झाल्यामुळे एनएचपीसीचे 19 कर्मचारी अडकले. भूस्खलनामुळे पॉवर हाऊसकडे जाणारा रस्ता बंद झाला. भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. सर्व काढण्यासाठी यंत्रे तैनात करण्यात आली आहेत. काही तासात रस्ता मोकळा होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर सर्व कर्मचारी बाहेर पडू शकतील, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. भूस्खलनामुळे राष्ट्रीय जलविद्युत महामंडळाचे 19 कामगार पॉवर हाऊसमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली. मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. धारचुलाजवळील इलागड परिसरातील धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या सामान्य आणि आपत्कालीन बोगद्यांकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. सीमा रस्ते या जेसीबीने साफ करण्याचे काम सुरू आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. पॉवर हाऊस उघडल्यानंतर हे कर्मचारी बाहेर येतील. पॉवर प्रोजेक्टमधून वीज निर्मितीचे काम सामान्यपणे सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button