108 रुग्णवाहिकेद्वारे 4 लाख नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा

अमरावती /30 मे: महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची 108 रुग्णवाहिका अमरावती जिल्ह्याची लाईफ लाईन ठरली आहे. जिल्ह्यातील 427926 नागरिकांनी रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला आहे. विशेषबाब म्हणजे दुर्गम मेळघाटातील 132864 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील 41316 नवजात बालकांनी रुग्णवाहिकेत जन्म घेतला आहे. परिणामी 108 रुग्णवाहिकेला फिरते प्रसुतीगृह म्हणून नव्याने ओळख मिळाली आहे. त्याचबरोबर 19474 अपघातग्रस्तांना सेवा देण्यात आपत्कालीन वैद्यकीय सेवेला यश आले आहे.
बदलत्या जिवनशैली मुळे शहरी व ग्रामिण भागात हृदय विकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे.हृदय विकाराच्या 5558 नागरिकांना तत्काळ वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे. विविध कारणास्तव भाजलेल्या 1340 अमरावतीकरांना आपत्कालीन वैद्यकीय सेवेने तत्काळ सेवा दिली आहे.

108 रुग्णवाहिकेने अशी दिली सेवा
वाहन अपघात : 19474
हल्ला : 2986
भाजणे : 1340
हृदयविकार : 5558
पडणे : 5613
नशा/विषबाधा : 9377
प्रसूती : 41316
विद्युतप्रवाह/ शॉक : 306
वैद्यकीय : 296727
इतर : 30390
पॉली ट्रॉमा : 14583
आत्महत्या/स्वतःला झालेली दुखापत : 256
एकूण : 427926

संबंधित बातम्या

Back to top button