जातीभेद विसरा, आपण राष्ट्रसंताचे लेक आहोत
मातृपितृ पूजनात वंदनीय ह भ प काळे महाराज यांचे काल्याचे कीर्तन

अमरावती /24 फेब्रुवारी : जे कार्य केल्यास आई-वडिलांची गुरुजनांची देशाची मान खाली जाणार नाही ते कार्य म्हणजे आपला धर्म. पुत्र कामी लागले, आपण वैराग्य घ्यावे, जातीभेद विसरा कोणत्या जातीचे आहात, पंथाचे आहात हे विसरा आपण राष्ट्रसंताचे लेक आहोत हे लक्षात ठेवा अशा अनेक बाबी एक ना अनेक गोष्टी मनोरंजक पद्धतीने सूर ताल व गायकीसह व वाद्य वृंदासोबत काल्याच्या कीर्तनात होत राहिले.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यस्मरण व मातृ-पितृ पूजन कार्यक्रम या तारेकर परिवाराच्या दरवर्षीच्या कार्यक्रमात दरवर्षीचे काल्याचे किर्तनकार वयाची सत्तरी पार केल्यावरही अतिशय उत्साहाने नाचत बागडत हसत हसवत वंदनीय ह भ प लक्ष्मणदास काळे महाराज नमूद करीत राहिले. त्यांच्या उत्साहात स्टॅमिना तळमळ पाहून कोणीही थक्क व्हावे अर्जुन नगर येथील रहिवासी काळे महाराज यांनी वयाच्या बाराव्या वर्षी घर सोडून देहू आळंदी येथे कीर्तनकाराचे प्रशिक्षण घेतले. मूळचे ते अमला विश्वेश्वर चे. तीन वर्ष आळंदी येथे प्रशिक्षण गेल्यावर घेतल्यावर गुरुकुंज मोझरी येथे आले. तुकडोजी महाराज विचार प्रचार शिबिरात राहिले. सहदेवराव तारेकर यांच्या संपर्कात आले सहदेवरावांचे कीर्तनात ते सहभागी व्हायचे जनसंपर्क वाढला व एक निष्णात प्रचारक व कीर्तनकार म्हणून त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. काल्याच्या कीर्तनात प्रमोद पोकळे दिनकर चोरे शालिकराम राऊत हभप काळे महाराज रुमणे दादा विजय माथने शरद जाणे विनायक धुळे गौरव वानखडे इत्यादी मंडळी सोबत देत होते. कार्यक्रमात अनेक मदतीचा हात सहकार्य विविध सत्कार तारेकर परिवारातर्फे होत राहिले. संपूर्ण तारेकर परिवार प्रकाश तारेकर यांच्या पुढाकारात हजर राहिला अनेक राष्ट्रसंत भक्त निमंत्रित मंडळी मोठ्या संख्येत हजर होती. संचलन आभार प्रकाश तारेकर व डॉ. गोविंद कासट यांनी केले.




