जी.एच.रायसोनी विद्यापीठात सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव
विद्यार्थ्यांनी दिले प्रतिभेचे परिचय

अमरावती /5 मार्च : युवकांमध्ये प्रतिभा आणि कौशल्यांची कमतरता नाही, फक्त त्यांना योग्य व्यासपीठ मिळण्याची गरज आहे. हे मत जी. एच. रायसोनी विश्वविद्यालय, अमरावती येथे आयोजित साप्ताहिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सिद्ध केले. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी अभिनय, गायन, नृत्य यांसह विविध मैदानी व इनडोअर खेळांतून आपली नेतृत्व क्षमता, बुद्धिमत्ता आणि कौशल्य दाखवून दिले. दोन टप्प्यांत आयोजित या महोत्सवाचा पहिला टप्पा क्रीडा स्पर्धांसाठी तर दुसरा सांस्कृतिक स्पर्धांसाठी होता. सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून द कॉलेज ऑफ निमेशन, बायोइंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर, अमरावती यांचे संस्थापक संचालक विजय राऊत उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड ह्युमॅनिटीज, अमरावती यांचे संचालक डॉ. सतीश मालोदे हेउपस्थित होते..
समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, संगीत गायन आणि फॅशन शोच्या माध्यमातून अतिथींसह सर्व दर्शकांना मंत्रमुग्ध केले. मुख्य अतिथी विजय राऊत यांनी विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांत उत्साहाने भाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, अशा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेष अतिथी डॉ. सतीश मालोदे यांनी म्हटले की, विद्यार्थीदशेचा हाच काळ बहिर्मुखी प्रतिभेला निखारण्याचा असतो.या वेळी विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. स्नेहिल जायसवाल, विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट, महोत्सव समन्वयक डॉ. शैलेश ठाकरे आणि डॉ. सचिन पडोले यांसह मान्यवर उपस्थित होते.




