आरोग्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज पाककला स्पर्धा
जागतिक महिला दिन सप्ताह : महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी पुढाकार

अमरावती /11 मार्च : जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, अमरावती आणि ओलावा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सप्ताहाच्या निमित्ताने विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आज गुरुवार दि. 12 मार्च रोजी दुपारी 4 वा. ‘आहार मार्गदर्शन कार्यक्रम’ व ‘पार्क कला स्पर्धा’ आयोजित करण्यात आले आहे
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व अधिक वाढले आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक जीवन शैली आवश्यक आहे. विशेषतः महिलांनी आपल्या दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक घटकांचा समावेश करून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याने महिला सप्ताहाच्या निमित्ताने महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये तज्ञांकडून संतुलित आहार, पोषणमूल्ये तसेच विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी आहाराचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले महिलांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आरोग्य मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल व ओलावा फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.




