बुलढाण्यात 1 लाखांहून अधिक बोगस मतदार

आ.संजय गायकवाड यांचा दावा

* आयोगाच्या भूमिकेवर गंभीर आरोप

बुलढाणा / 16 ऑक्टोंबर : शिवसेना (शिंदे गट) चे आमदार संजय गायकवाड यांनी मतदार यादीतील गोंधळावर गंभीर आरोप करत विरोधकांच्या मत घोटाळ्याच्या आरोपांना सुरात सुर मिळवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एकट्या बुलढाणा शहराच्या मतदार यादीत किमान 4 हजार मतदारांची नावे दुहेरी आहेत, मृत मतदारांची नावे अजूनही कायम आहेत, तसेच येथून बदलून गेलेल्या अधिकार्‍यांची नावेही यादीत आहेत. बलु ढाणा जिल्ह्याच्या मतदार यादीत अशी गडबड एक लाखापेक्षा जास्त मतदारांमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी दिनेश वाघमार यांच्यासोबत चर्चा केली आणि यादीतील सुधारणा, मृतकांची नावे, डबल नावं वगळण्याची मागणी केली. त्यांनी प्रश्न उपस्थित करत असा सवालही केला की, कायद्यानुसार मृतकांची नावे का वगळली जात नाहीत आणि यासाठी मृत्यू दाखला आधारकार्डशी लिंक करून यादीशी जोडले पाहिजे. त्यांनी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहून बलु ढाणा शहरातील चार हजार दुहेरी नावं यादीतून डिलीट करण्याची मागणी केली. याआधीच भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आणि बुलढाणा शहर अध्यक्ष मंदार बाहके यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीत गंभीर आक्षेप नोंदवला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादी आगामी निवडणुकांसाठी ग्राह्य ठरणार आहेत. प्रसिद्ध याद्यावर भाजपने दुहेरी नावं व मृतकांची नावे वगळण्याची मागणी सहपालक मंत्री संजय सावकार आणि जिल्हाधिकारी बलु ढाणा यांच्या कडे केली होती. यावर जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी तत्काळ आदेश दिला. बुलढाणा विधानसभा मतदार संघातील जवळपास 3546 मतदारांची नावे पुन्हा तपासली गेली, तसेच बुलढाणा शहरातील जवळपास 800 मतदारांची नावेही पुन्हा तपासली गेली; तरीही काही मृतकांची नावे अजूनही यादीत आहेत. या तक्रारीत असे नमूद केले गेले की, मतदान हे निर्णायक स्वरूपाचे ठरू शकते, राजकीय हस्तक्षेप करून काही नावे वगळण्यात आली नसल्याचे दिसून येते. यादीतील नाव, वय, पत्ता आणि यादी भाग क्रमांक यामध्ये बर्‍याच अडचणी आढळल्या आहेत, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवर परिणाम होत आहे, आणि अशा गडबडीनं आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button