दुचाकीच्या अपघातात युवक ठार

चिखलदरा / 22 मे: भरधाव दुचाकी स्लीप होवून घडलेल्या अपघातात दुचाकी चालक युवकाचा गंभीर दुखापत होवून घटनास्थळीच मृत्यु झाला. हा अपघात चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री येथे आदिवासी आश्रम शाळेसमोर घडला. निलेश मुन्ना आखंडे (30, कोटमी, चिखलदरा) असे मृतकाचे नाव आहे.
निलेश हा त्याच्या भावासह बुटिदा या गावी कार्यक्रमानिमित्त आपल्या एमएच 27, डब्ल्यू 4280 क्रमांकाच्या मोटरसायकलने गेला होता. परत येताना काम असल्याने तो भावाला तेथेच सोडून एकटाच आपल्या गावाकडे निघाला. त्याचा भाउ गावातील एका इसमासोबत दुचाकीने परतत असताना त्यांना दहेंद्री येथील आश्रम शाळेसमोर निलेशच्या दुचाकीचा अपघात झाल्याचे दिसले. निलेश हा दुचाकीच्या बाजूला मृतावस्थेत पडलेला होता. यावेळी तात्काळ मोबाईलवरुन चिखलदरा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दुचाकी स्लीप झाल्याने हा अपघात घडला आणि त्यात गंभीर दुखापत होवून निलेश आखंडेचा मृत्यु झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी मृतक निलेश आखंडेवर स्वत:च्या मृत्युसाठी कारणीभूत ठरल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button