कौंडण्यपूर वारकर्‍यांच्या सह माता रुख्मीणीच्या पालखीचे स्वागत

माता रुख्मीणी व पांडुरंगाला केली सुनिल राणा यांनी प्रार्थना

* स्वागताकरिता शेकडो युवा स्वाभिमान पार्टी कार्यकर्त्यांची उपस्थिती

अमरावती /3 जून: नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी युवा स्वाभिमान पार्टी समाजकारणा सोबतच अध्यात्मीकते मध्ये सुद्धा पुढाकार घेवून धर्माचे पालन करीत असल्याचे नेहमीच निदर्शनास येते. दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त अमरावती जिल्ह्यातुन विविध गावातुन विविध संस्थेच्या व मंदिराच्या पालख्या पैदल वारी करुन विठ्ठलाचे दर्शन घेण्याकरिता जात असतात.
त्या अनुषंगाने माता रुख्मीणीचे माहेर असलेले कौंडण्यपुर येथुन सुद्धा शेकडो वारकर्‍यांना घेवून माता रुख्मीणीच्या पालकीसह पंढरपुरला निघाले असता या पालखीचे राजापेठ चौक येथे युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक सुनिल राणा यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह सर्वप्रथम पालखीचे पुजन करुन दर्शन घेतले व स्वागत केले. तसेच पालखीमध्ये सहभागी असलेल्या एका जेष्ठ वयोवृद्ध महिलेसोबत फुगडी खेळुन फुगडीचा आनंद सुद्धा घेतला तसेच आ.रवि राणा व मा.खा.नवनित राणा व समस्त युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने शेतकरी, शेतमजुरांच्या तसेच सर्व सामान्य जनतेच्या जीवनात सुख समृद्धी नांदो याकरिता माता रुख्मीणी व पांडुरंगाला प्रार्थना सुद्धा केली. यावेळी कमलकिशोर मालानी, प्रा.अजय गाडे, मंगेश पाटील, ज्योती सैरिसे, सुमती ढोके, राजा बागडे, चंदा लांडे, अर्चना तालन, सचिन भेंडे, धर्मेंद्र मेहरे, श्याम कथे, अशोक पांडे, अवी काळे, गजानन बोंडे, अन्ना कुंभलकार, राजु अंबाडकर, सुरज मिश्रा, दिपक खटाळे, श्रीकृष्ण बैलमारे, दिलीप भाकरे, संतोष गवळी, पोकळे गुरुजी, अनिल शुक्ला, शालीनी देवरे, वंदना जामनेकर, कल्पना शर्मा, राजु कोरडे, अमृत मुथा, शर्मिला मिश्रा, किरण पोकळे, तुषार दुधे, सुधिर लवणकर, अजय बोबडे, आकाश राजगुरे, राजेश दातखोरे, आनंद भोयर, हिरपुरक, प्रयास चर्‍हाटे, संकेत गादे, मोहन जोशी व असंख्य युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button