अज्ञात वाहनाची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यु

एक गंभीर, तिवसा तालुक्यातील घटना

तिवसा / 19 जून: भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला तर त्याचा सहकारी गंभीररीत्या जखमी झाला. हा अपघात तिवसा तालुक्यातील वरखेड ते वणी ममदापूर येथे घडला. गजानन पंडितराव टोहणे असे मृतहाचे तर अक्षय मारब्दे असे जखमीचे नाव आहे.
मोर्शी तालुक्यातील निंबारणी गावातील रहिवासी असलेले गजानन टोहणे आणि अक्षय मारब्दे हे दोन मित्र आपल्या मोटरसायकलने जळगाव बेलोरा या गावाला काही कामानिमित्त जात होते. वरखेड फाटा ते वणी ममदापूरदरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात गजानन टोहणे यांच्या डोक्याला जबर दुखापत होवून त्यांचा मृत्यु झाला. त्यांचा मित्र अक्षय बारब्दे या अपघातात गंभीररीत्या जखमी झाला. याप्रकरणात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास व मृत्युस कारणीभूत ठरल्याबद्दल आरोपी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तिवसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button