अवैधरित्या दारू वाहतूक करताना दोघांना अटक
बडनेरा पोलिसांची कारवाई

अमरावती /10 जून: मोटारसायकलवरून विदेशी दारू घेऊन जाताना बडनेरा पोलिसांच्या पथकाने दोन तरुणांना अटक केली आहे. दुचाकीसह जप्त केलेल्या मालाची किंमत 70,600 रुपयेआहे. रोहित अरविंद वानखडे (26), रा. राहुल नगर, बडनेरा आणि आकाश नारायण हिवराळे (28), रा. पांचबंगला अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बडनेरा पोलीस ठाण्याचे प्रमुख सुनील चव्हाण यांना गुप्त माहिती मिळाली होती की, दोन तरुण बेकाय देशीर विक्रीसाठी मोटार सायकल वरून विदेशी दारू घेऊन जात आहेत. या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक सचिन माकोडे, कॉन्स्टेबल सुधीर प्रांजळे, इरफान रायलीवाले, शशी शेळके, धनराज ठाकूर, बाबूसिंग राठोड, शुभम कडूकर यांच्या पथकाने रोहित वानखडे आणि आकाश हिवराळे यांना दुचाकीवरून पोत्यात भरून दारू घेऊन जात असताना अटक केली. त्यांच्याकडून 10,600 रुपये किमतीची परदेशी दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी त्यांची दुचाकीही जप्त केली आहे.