भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ मोर्शीत निघाली तिरंगा रॅली
शेकडो नागरिकांचा सहभाग, संपूर्ण शहर तिरंगामय

-भारतमातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमला
मोर्शी / 22 मे: पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून आपल्या अतुलनिय शौर्याचे दर्शन घडविले. त्याबद्दल सैन्यदलाच्या सन्मानार्थ आज मोर्शी शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. तिरंगा यात्रा समिती आणि देशप्रेमी नागरिक यांच्या वतीने आमदार उमेश यावलकर यांच्या नेतृत्वात या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमुळे संपूर्ण शहर तिरंगामय झाले होते. भारतमातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवार काढण्यात आलेल्या या रॅलीत भाजपाचे कार्यकर्ते तथा राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते. रामजीबाबा मंदिरापासून आमदार उमेश यावलकर यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून तिरंगा रॅलीची सुरुवात झाली. ही तिरंगा रॅली समोर मार्गक्रमण करीत माळीपुरा, सूर्योदय चौक, गुजरीबाजार चौक, गांधी चौक, मुख्य बाजारपेठ येथून जयस्तंभ चौक येथे रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी सुभेदार गणेश वैद्य, दामोधर अडोळे, संभावित सर, नंदकिशोर कळसकर, संदीप कडू, उमेश चरपे, केदार सर, दिलीप खंडारे, मानकर सर, अशोक भुयार, अमृते सर, देशपांडे सर, धुर्वे सर, राजेश देशमुख, सुदाम फंदे, काळे सर, नरेश बोकड, धोटे सर या सैनिकांचा आमदार यावलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. हातात तिरंगा ध्वज, भारत माता की जय, वंदे मातरम, हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा गगनभेदी घोषणेने मोर्शी नगरी दुमदुमली. या तिरंगा रॅलीत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत, माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, मंगला श्रीराव, सुनील ढोले, राहुल चौधरी, उमेश कोंडे, नितीन उमाळे, ज्योतीप्रसाद मालवीय, नितीन राऊत, शुभम भोजने, सुशील थोटे, नितीन चिखले, मनीष केचे, अंकुश धावडे, सतीश लेकुरवाडे, सुनीता कोहळे, सुनंदा लाडवीकर, रवी मेटकर, अजय साबू, चंदू नाकाडे, बाबाराव जाधव, संगीता तायडे, भास्कर पाटील, मंगेश अकर्ते, राजेश गजबे, ऋतिक मालपे, वर्षा व्यवहारे, भारती महाजन, अनिता लांजेवार, शारदा खाजवणे, शीला धावडे, नेवारे ताई, मनोहर शेंडे, रावसाहेब अढावू, अजय काकपुरे, रवी मेटकर, विजय तापडिया, चेतन काळमेंघ, पवन अकर्ते, अजय आगरकर, श्रीकांत मांडवे, अशोक देशमुख, सागर ताजने, प्रतिभा राऊत, भाग्येश घुलक्षे, मनीष धर्माधिकारी, उमेश जंजाळकर, प्रमोद हरणे, मनोज कडू, राजेश खाटगडे, सचिन तायवाडे, दीपक नेवारे, लकी पुरोहित प्रामुख्याने सहभागी झाले होते.