विभागीय आयुक्तालयात कार्यालयात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना अभिवादन

अमरावती /28 मे: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.