‘एक पेड मा के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण

आ.राजेश वानखडे यांच्याकडून जागतिक पर्यावरण दिन साजरा

तिवसा /5 जून: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार एक पेड़ माँ के नाम या अभियानांतर्गत आज आमदार राजेश वानखडे यांनी तिवसा येथील घरासमोर वृक्षरोपण करून या अभियानाला सुरुवात केली.
5 जुन हा जागतिक पर्यावरण दिन म्हणुन साजरा केला जातो, हा केवळ एक दिन नसुन पर्यावरण संवर्धनाची मोठी मोहीमच या दिवशी राबवली जाते, तसेच सहकार विभागातर्फे तिवसा तालुका जिंनिग व प्रेसिंग सहकारी संस्था तिवसा येथे वृक्षरोपण करण्यात आले. व भाजपा तालुका सरचिटणीस सुधीर गोंडसे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षरोपण करून साजरा करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदिपभाऊ गौरखेडे, नगरसेवक अनिलभाऊ थूल, माजी तालुकाध्यक्ष निलेश श्रीखंडे, तालुकाध्यक्ष सागर शिंगाणे, शहराध्यक्ष अजय गुल्हाने, संचालक चेतन वानखडे, सहाय्यक निबंध सह.संस्था. तिवसा सौ.प्रीती धामने माँडम, श्री.मनोज रोहणकर, श्रेणी.अधिकारी. सौ दुर्गा वडुरकर. उपलेखा परिक्षक तिवसा सर्व संस्थेचे सचिव सागर शिगाणे, श्रीप्रसाद र.दिघडे, आशिष इंगोले, वैभव खोडस्कर, सचिन क्षिरसागर, विजय माहोरे, शेटेसाहेब , वैशाली देवळे, विनोदभाऊ पटेल, प्रकाश पडोळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुमित अनासाने, उपाध्यक्ष अंकुश देशमुख, सुरज तवर, सुधीर वानखडे,डॉ. तेजस जोशी, सतीश आंबुलकर, मोहित मोटघरे, प्रथमेश गौरखेडे, रोशण राठी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button