जागातिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यापीठात वृक्षारोपण
कुलगुरूंच्या हस्ते शुभारंभ

अमरावती /5 जून: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आज (गुरूवार 5 जून 2025) वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोर कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. नितीन कोळी, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग संचालक डॉ. श्रीकांत पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, कार्यकारी अभियंता श्री. शशिकांत रोडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, अधिसभा सदस्य डॉ. जयंत वडतकर, कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री. अजय देशमुख, उपअभियंता (विद्युत) श्री राजेश एडले, उद्यान अधीक्षक श्री अनिल घोम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी विद्यापीठात एक हजार वृक्षारोपण करणार – कुलगुरू
यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सांगितले की, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यावर्षी पावसाळी हंगामात विद्यापीठ परिसरात एक हजारपेक्षा जास्त नवीन वृक्षांचे रोपण करणार आहे. विद्यापीठाचा निसर्गरम्य परिसर 450 एकरमध्ये पसरलेला असून, सध्या येथे साडेचार लाखांहून अधिक वृक्ष डौलदारपणे उभे आहेत. ज्यामुळे पर्यावरण संवर्धनात विद्यापीठाचे मोठे योगदान मिळत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी विद्यापीठाला यापूर्वी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पाच नामांकित पुरस्कार प्राप्त झाले आहेत, असेही कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी यावेळी नमूद केले. विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील सर्व विद्याथ्र्यांनी मोठा प्रमाणावर आपापल्या परिसरात वृक्षारोपण करावे व पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहनही कुलगुरूंनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले. विद्यापीठ परिसर म्हणजे शहराचा ’ऑक्सिजन पार्क’ विद्यापीठाच्या 450 एकर परिसराचे ’अमरावती शहराचा ऑक्सिजन पार्क’ असेही वर्णन यावेळी करण्यात आले. या परिसरात साडेचार लाखांहून अधिक विविध जाती-प्रजातींची झाडे आहेत. याव्यतिरिक्त दोन मोठे जलाशय आणि अनेक बंधारे असल्यामुळे जमिनीत मोठा प्रमाणात पाणी मुरते, ज्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे. विविध पशुपक्षी आणि वृक्षांनी नटलेला हा परिसर निसर्ग सौंदर्यात भर घालत असून, विद्यापीठाचा परिसर पर्यावरण संवर्धनाचा एक मानबिंदू ठरला आहे. वृक्षारोपण करण्याकरीता खड्डे खोदणे व वृक्षारोपणासंदर्भात सर्व कामे करण्याकरीता उद्यान विभागातील कर्मचारी व मजूरांनी अथक परिश्रम घेतलेत. यावेळी विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक व कर्मचारी मोठा संख्येने उपस्थित होते.