विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

अमरावती/28 मे- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. आर.डी. सिकची, प्राचार्य डॉ. व्ही.एच. नागरे, प्राचार्य डॉ. हेमंत देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, ननसा संचालक डॉ. अजय लाड, सहा. कुलसचिव डॉ. साक्षी ठाकुर तसेच विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारीे उपस्थित होते. संचालन व स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.

संबंधित बातम्या

Back to top button