उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार यांची पिस्तुल चोरीस

गाडीच्या काचा फोडून चोरट्यांचा कारनामा

* मोर्शीच्या निवासस्थानी घडली घटना                                                                                                                              मोर्शी /8 ऑगस्ट – मोर्शी येथीलउपविभागीय राजस्व अधिकारीप्रदीपकुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी उभ्या असलेल्याखाजगी कारच्या काचा फोडून चोरट्यांनी त्यांची वैयक्तिक पिस्तूल चोरून नेल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे.या प्रकारामुळेप्रशासकीय वर्तुळात खळबळउडाली असून पोलिसांतून घटनेची सखोल चौकशी सुरूआहे.मिळालेल्या माहितीनुसारगाडी क्रमांक एम एच 29 एआर6600 ही पवार यांची खाजगीचारचाकी वाहन शासकीयनिवासस्थानी उभी होती. आज 8ऑगष्ट रोजी सकाळी सुमारे 11वाजता पवार हे अमरावती येथून मोर्शीला आले. शासकीय निवासस्थानी पोहचल्यानंतर त्यांनी ही खाजगी कार त्यांच्या निवासस्थानीउभी करून शासकीय वाहनानेपुढील दौर्‍यासाठी वरुड येथे गेले होते.सायंकाळी 6 वाजता पवार यांच्या कार्यालयातील शिपाई पाणी टाकण्यासाठी गाडीपाशी जाताच त्याला गाडीच्या समोरीलकाचेचा तुकडा पडलेला दिसून आला. याबाबत त्याने तातडीने पवार यांनाफोन करून माहिती दिली.पवार यांनी गाडीत असलेल्या वैयक्तिक पिस्तूलबाबत चौकशी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की पिस्तूलगाडीतून चोरीस गेले आहे.या घटनेनंतर त्यांनी मोर्शी पोलीस ठाण्याशीसंपर्क साधून तक्रार नोंदवली असूनअधिकृत फिर्याद दाखल करण्याचीप्रक्रिया सुरू आहे.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक तपास सुरूकेला असूनसीसीटीव्ही फुटेज,स्थानिक गुन्हेगारी पोर्शभूमी असलेल्याव्यक्तींची माहिती घेतली जात आहे.चोरट्यांनी पिस्तूल नेल्यामुळे सुरक्षायंत्रणांमध्येही चिंतेचं वातावरण आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेतजिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत अधिक तपासाचीसूचना देण्यातआली असून लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन पिस्तूल हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button