वीज चोरट्यांवर आता कठोर कारवाईचा बडगा
मुख्य अभियंता अशोक साळुंके यांचे निर्देश

-महावितरणचे 210 जणांचे पथक गठित
-गळती 15 टक्क्यांवर आणण्याचे लक्ष
अमरावती / 14 मे: अमरावती परिमंडळाची वीज वितरण हानी 29 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपेक्षा कमी करणे, वीज सेवेत गुणात्मक सुधारणा करणे यासाठी परिमंडळात अनाधिकृत वीज वापरणार्यांच्या विरोधात विशेष धडक मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी परिमंडळात 210 पथकाची निर्मिती करण्यात आली असून प्रत्येक पथकाला वीज चोरी पकडण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.
विजेचा अनधिकृत वापर करुन वीज चोरणे हा फौजदारी गुन्हा आहे. तसेच वीज चोरीमुळे महावितरणचे आर्थीक नुकसान होते. शिवाय यंत्रणेवर पडणार्या अतीरिक्त ताणामुळे शॉर्टसर्कीट होणे, जंपर तुटणे, रोहित्र जळणे यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे सुरळीत वीज पुरवठ्यास बाधा निर्माण करणार्यांविरोधात थेट कारवाई करण्याचे निर्देश अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी दिले आहे.
प्रत्येक शाखा कार्यालयाला एक पथक, याप्रमाणे परिमंडळाअंतर्गत अमरावती जिल्ह्यात 130 पथके आणि यवतमाळ जिल्ह्यात 80 पथके तयार करण्यात आले आहे. प्रत्येक पथकात पथक प्रमुख म्हणून शाखा अभियंता राहणार आहे. याशिवाय वीज चोरी पकडण्याच्या मोहिमेला गती देण्यासाठी वरीष्ठ अधिकारी मोहिमेत सहभागी होणार आहे. या मोहिमेत फॉल्टी मीटर, सरासरी वीज बिल, शुन्य वीजबिल, कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांचीही तपासणी करण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान वीज जोडणीच्या ठिकाणी अवैधपणे आढळणार्या वीज पुरवठ्याविरूध्द विद्युत कायदा 2003 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच थकबाकी असलेल्या ठिकाणी शेजार्यांकडून अनाधिकृत वीज जोडणी देण्यात आली असेल, तर त्या शेजारी ग्राहकांवरही कायदेशीर कारवाई होणार आहे.
-वीज चोरी कळवा बक्षिस मिळवा
वीज चोरीच्या प्रकरणांमुळे वीज हानीबरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी ‘महावितरण’ने ‘वीज चोरी कळवा आणि 10 टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे, भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये वीजमीटरमध्ये जाणीवपुर्वक ़फेरफ़ार करून होणार्या वीजचोर्यांची माहिती असणार्यांनी पुढाकार घेत यासंबंधी माहिती द्यावी, माहिती कळविणार्याचे नाव गुप्त ठेवल्या जाईल. महावितरणच्या मोबाईल एपवर तसेच