मतदार नोंदणी करीता नागेश लोणारे यांचे विशेष शिबीर संपन्न

वडाळी प्रभाग क्र 9 बागडे लेआऊट, शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

अमरावती /26 मे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून नागेश लोणारे यांनी अभिवादन करण्यात आले. व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस संगणक विभाग, अमरावती मनपाचे श्री. ऋषीकेश चवरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक कार्यकर्ता नागेश लोणारे यांच्या संकल्पनेतून भव्य मतदार नोंदणी अभियान कार्यक्रमाअंतर्गत दोन दिवसीय उपक्रम मतदार नोंदणीचे आयोजन शनिवार दि.24 मे व रविवार 25 मे 2025 रोजी बागडे लेआऊट प्रांगणात येथे करण्यात आले होते. सदर उपक्रमाअंतर्गत शेकडो नागरिकांनी या नव नोंदणी कार्यक्रमाचा लाभ घेतला. वृद्ध, स्त्रिया, युवक, युवती, विद्यार्थी, व समाजातील प्रत्येक घटकांनी संबंधित कार्यक्रमाअंतर्गत आपल्या मतदानाच्या हक्कासाठी नव नोंदणी उपक्रमात सहभाग घेतला. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नवयुवकांची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त युवकांची मतदार नोंदणी व्हावी यासाठी सामाजिक उपक्रमातून प्रयत्नशील असून या कार्यक्रमात सहभाग घेवून मतदार नोंदणी करावी. अश्या आशयाचे मनोगत नागेश लोणारे यांनी व्यक्त केले. या नव मतदार नोंदणी उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते प्रांजल खडसे, सुधीर नागदिवे, जितेंद्र माटे, संतोष गायकवाड, सिद्धार्थ शेंडे, आकाश राऊत, यांनी अथक परिश्रम घेत नागरीकांच्या मतदार कार्ड संबंधातील प्रश्न सोडविले. यावेळी ज्ञानेश्वर रंगारी, सुरेंद्र डोंगरे, चंद्रशेखर वानखडे, बागडे लेआऊट येथील नागरीक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button