शेतकर्यांना खरीप हंगामापुर्वीच अवकाळीचा फटका
खत दरवाढीच्या झटक्याने अर्थचक्र बिघडणार

चांदूरबाजार /29 मे: खरीप हंगामापूर्वीच फटका सुरू होत असला तरी त्यापूर्वीच शेतकर्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यात आता रासायनिक खते व बियाण्यांच्या दरवाढीचाही झटका शेतकर्यांना दिला गेला आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्यांच्या पेरणीचे अर्थचक्र बिघडण्याची शक्यता आहे. खतांच्या दरात प्रतिगोणी 100 ते 270 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे रासायनिक खतांवरील सबसिडीत कपात करण्यात आल्याने खतांच्या किमती वाढल्याचे दावे कंपन्यांकडून केले जात आहेत.
मशागतीस प्रारंभ झाला आहे. पेरणीच्या कालावधीत खतांची मागणी शेतकर्यांकडून वाढते. यंदा मात्र आवश्यक असलेल्या युरियाव्यतिरिक्त जवळपास सर्वच रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात खरिपाचे सव्वासहा लाख हेक्टर क्षेत्र आहे. यात भात, मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग, बाजरी, मूग, मठ आदींची पेरणी होते. त्यासाठी बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध असला, तरी मका बियाण्याच्या किमतीत प्रतिकिलो 100 रुपयांची वाढ झाली आहे. रासायनिक खते शेतक र्यांना मिळावी, यासाठी कृषी विभागाचे नियोजन आहे. खतांचे लिंकिंग होवू नये यासाठी कृषी विभाग आता पासून कामाला लागला आहे.युरीया वगळता रासायनिक खतेही महागली आहे.प्रतिगोणी 100 ते 270 रुपयापर्यंत वाढ झाली आहे.10:26:26 या खताच्या किंमतीत यंदा तब्बल 250 रुपयांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.पुर्वी या खताची एक बॅग 1470 रुपयात मिळत होती ती यंदा 1720 रुपयांना विकत घ्यावी लागणार आहे. 99 सिंगल सुपर फॉस्फेटच्या किमतीत 70 ते 80 रुपयांनी वाढ झाली आहे. जवळपास सर्वच रासायनिक खतांच्या किमती सरासरी 100 रुपयांनी, तर काही खतांच्या किमती 250 ते 300 रुपयांनी वाढल्या आहेत. खरिपात सोयाबीन, कापूस व तूर ही मुख्य पिके असतात. या पिकांच्या पेरणीच्या वेळी शेतकरी पिकांची वाढ जोमाने व्हावी, यासाठी खतांच्या मात्रा देतात. कोरडवाहू पट्टयात कापूस हे मुख्य व नगदी पीक असून, पेरणीक्षेत्र अधिक राहते. कपाशीच्या बियाण्यांच्या किमतीत वाढ झाली असताना आता खतांच्याही किमती वाढल्याने शेतकर्यांचा पेरणीचाच खर्च वाढणार आहे.
अशा वाढल्या किंमती
18:18:10 पुर्वीचे दर 1200 आताचे दर 1300 (वाढ 100)
20:20:00 पुर्वीचे दर 1250
आताचे दर 1350 (वाढ 100)
12:32:11 पुर्वीचे दर 1410 आताचे दर 1750 (वाढ 280)
19:19:19 पुर्वीचे दर 1600
आताचे दर 1800 (वाढ 200)
24:24:00 पुर्वीचे दर 1700
आताचे दर 1850 (वाढ 150)
10:26:26 पुर्वीचे दर 1470
आताचे दर 1720 (वाढ 250)
सबसीडीसाठी फार्मर आयडी अनिवार्य
विक्रेत्याकडून खते विकत घेतांना शेतकर्यांना फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.त्यासाठी त्यांना विक्रेत्याकडील पॉस मशीनवर थम्ब द्यावा लागणार असून त्यानंतरच शेतकर्यांना सबसीडी मिळणार आहे.