अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.रा.गो. चवरे यांची निवड
दुसरे परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलन 6 जुलै रोजी

अमरावती /21 मे: बिलीव्ह फाऊंडेशन, सृजन साहित्य संघ शाखा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलन 6 जुलै रोजी अमरावती येथे होणार असून या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.रा. गो. चवरे,पुणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
रविवार दि.4 मे 2025 रोजी कांचन रिसॉर्ट अमरावती येथे झालेल्या आयोजन समितीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. साहित्य संमे लन विष यक नियोजनाबाबत यावेळी चर्चा संपन्न झाली.
डॉ.श्री रा. गो. चवरे हे साहित्यिक तसेचं नाट्यकलावंत असून त्यांनी ’मुंबईची माणसं’ आणि ’देव नाही देव्हार्यात’ या दोन नाटकांत मुख्य अभिनेत्यांची भूमिका पार पाडली आह. ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे माजी सदस्य तसेच अमरावती विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत.विविध व्याख्याने व चर्चा सत्रांमध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग राहिलेला आह.कविता, कथा, कादंबरी, ललित, समीक्षा, स्फूट लेखन, संशोधनपर लेखन आदि अनेक विषयांवरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध आह. तसेच विविध नामांकित पुरस्कारांनी त्यांना राज्यभरातून गौरविण्यात आलेले आहे. या निमित्याने भव्य कथा व काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी साहित्यिकांनी आपल्या दर्जेदार कथा लेखक श्री विशाल मोहोड मो.90115 78771 व कविता शीतल राऊत मो.9422156697 या व्हाट्सअँप क्रमांकावर युनिकोडमध्ये टाईप करून 5 जून पर्यंत पाठविण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आह.सर्वोत्कृष्ट तीन क्रमांकांना संमेलनात पारितोषिकांसह सन्मानीत करण्यात येईल व स्मरणिकेत स्थान देण्यात येईल.तसेच समाजसेवा, साहित्य, कला, आरोग्य व पत्रकारिता या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्या नामवंतांना परिवर्तन पुरस्कार देऊन उद्घाटन समारंभात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आह.याशिवाय संमेलनात पुस्तकांचे विमोचन देखील करण्यात येणार आह.ज्यांना आपल्या साहित्यकृती प्रकाशीत करावयाच्या आहेत त्यांनी वरील नंबरवर संपर्क साधावा. साहित्य संमेलनाच्या आयोजन व नियोजनाबाबत पार पडलेल्या या बैठकीला परिवर्तन प्रबोधिनीच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शोभाताई रोकडे, सृजन साहित्य संघाचे अध्यक्ष,कादंबरीकार डॉ.श्यामसुंदर निकम, सचिव व लेखक श्री दीपक दारव्हेकर, उपाध्यक्ष व सिनेअभ्यासक वा. पां.जाधव, संवेदना बहुद्देशीय संघाचे अध्यक्ष गजानन काकडे,उपाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक विशाल मोहोड,प्रसिद्ध वर्हाडी कवी खुशाल गुल्हाने,कवयित्री शीतल राऊत, लेखक तथा संपादक विशाल कन्हेरकर, साहित्यिक व उद्योजिका कांचनताई उल्हे आदि मान्यवर उपस्थित होते.