रजीया सुलताना यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

अमरावती /25 मे: शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या स्तंभ लेखिका आणि सहित्यीक रजिया सुलताना यांच्या ताराबाई शिंदेच्या निबंधातील आजचे सामाजिक वास्तव ह्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुणे येथील बालगंधर्व रंग मंदिरात झालेले आहे.
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रियमंत्री खासदार शरदजी पवार उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणुन ज्येष्ठ साहित्यीक बाबा भांड, ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीराम पवार आणि इतिहास संशोधक डॉ. प्रकाश पवार हजर होते.
प्रकाशन सोहळ्याला शिवस्पर्श प्रकाशनाच्या प्रकाशिका अॅड. शैलजा मोळक, पुणे मनपाचे नियुक्त अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक आणि मानदेश फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतनागाला सिन्जर होत्या. प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक शैलेश मोळक यांनी केले. रजिया सुलताना याचे हे 36 वे पुस्तक आहे आपल्या अध्यक्षीय भाषणातुन खासदार शरदजी पवार यांनी रजिया सुलताना यांच्या पुस्तकाचा थोडक्यात आढावा घेतला.
कार्यक्रमाला मुस्लीम सत्यशोधक मंडळ, राष्ट्र सेवा दल, शिवस्पर्श प्रतिष्ठाणचे सदस्य आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाचा समारोप झाला.