रवि राणा आज स्विकारणार आश्वासन समितीचे अध्यक्षपद

अमरावती /18 मे: बडनेराचे आमदार रवी राणा यांची विधानसभा आश्वासन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ते सोमवार, 19 मे रोजी दुपारी 12 वाजताआपला अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विधानभवनातील चौथ्या माळ्यावर असलेल्या ममध्यवर्ती सभागृहात हा समारंभ होणार आहे. पदभार स्विकारल्यानंतर लगेच समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात समितीच्या सदस्यांसह इतिवृत्तातील कामकाजाचा आढावा आमदार व समितीचे अध्यक्ष रवी राणा हे घेणार आहेत. या बैठकीला आश्वासन समितीचे सदस्य आमदार सर्वश्री राजेश पवार, समिर मेघे, अनुपभैय्या अग्रवाल, विनोद अग्रवाल, विक्रम पाचपुते, सचिन कल्याण शैट्टी, पराग शहा, रमेश कराड, किशोर पाटील, अमोल पाटील, प्रदिप जयस्वाल, किरण सामंत, हिरामण थोसकर, संजय बनसोडे, दौलत दरोडा, वरुण सरदेसाई, अमित झनक, राजु खरे यांची उपस्थिती राहणार आहे. पहिल्याच दिवशी विविध प्रश्नाविषयी व दिलेल्या आश्वासनाविषयी सर्व सामान्य नागरीकांचे हित लक्षात घेउन कामकाज करणार असल्याचा मनोदय रवि राणा यांनी व्यक्त केला आहे.