राजापेठ चौक मित्र मंडळाला आ. संजय व सुलभाताई खोडके यांची भेट

अमरावती /2 जून: शहरातील अमृत भाई मुथा यांच्या मार्गदर्शनात राजापेठ चौक येथे त्यांच्याच निवासस्थानासमोर होत असलेल्या राजापेठ चौक मित्र मंडळाच्या ताक वाटप कार्यक्रमास आमदार संजय व आमदार सुभाताई खोडके यांनी सदिच्छा भेट दिली.
चौकातून पायी सायकल ऑटो स्कूटर कार व एसटी मधून जाणार्‍या वाटसरूंना विनंतीपूर्वक थांबवून ऑटोकार एसटीमध्ये बसल्या जागी ताक व जलेबी वाटप कार्यक्रम मित्र मंडळ तर्फे केल जातो. या कार्यक्रमास जाता येता राजापेठ चौक मित्र मंडळाचे सदस्यांची भेट तर असतेच पण ते स्वतः थांबून ताक वाटपही करतात हे सर्व कार्य जाणून समजून घेऊन आमदार खडके दाम्पत्यांनी या कार्याचे कौतुक केले. तसेच अमृत मुथा यांच्या निवासस्थानात प्रांगणात केलेल्या राशन वाटपाचेही कौतुक केले.
याप्रसंगी महेंद्र भुतडा नितीन चांडक मीना मुथा प्रकाश बोकाडिया सुरेश व धर्मेंद्र मुनोत एड. गौरव लूनावत सीए निलेश लाठीया विवेक सहस्त्रबुद्धे अक्षय ओस्तवाल राजेंद्र बूच्चा सुरेश साबद्र परम देवडा अशोक धोका इत्यादी मंडळी हजर होते. संचलन डॉ. गोविंद कासट तर आभार प्रदर्शन प्रकाश बोकाडिया यांनी मानले.

संबंधित बातम्या

Back to top button