6 दिवस विविध भागात वीज पूरवठा खंडित राहणार
महावितरणकडून देखभाल दुरुस्तीची कामे

अमरावती / 28 मे: पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आगामी काळात सुरूळीत वीज पुरवठा करण्याच्या दृष्टिने महावितरण शहर विभागाअंतर्गत जुने पॉवर हाऊस वितरण केंद्राने देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेतली आहे. गुरूवार 29 मे पासून या कामाला सुरुवात होत आहे. मंगळवार 3 जुन पर्यंत हे काम चालणार आहे. यादरम्यान फिडर निहाय देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार असल्याने सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत त्या -त्या भागाचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय सराटे यांनी केले आहे.
उद्या 29 मे रोजी 11 केव्ही श्रीकृष्णपेठ फिडरवरील देखभाल दुरूस्ती करण्यात येणार असल्याने या फिडरवरून वीज पुरवठा होणार्या श्रीकृष्णपेठ, इर्विन चौक येथील काही भाग, शिवाजी सायन्स कॉलेज, तहसील, देवराव गॅरेज या भागाचा वीज पुरवठा सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेदरम्यान बंद राहणार आहे. शुक्रवार 30 मे रोजी 11 केव्ही चौधरी चौक फिडर वरील वॉलकट कंपाऊंड, कॉटन मार्केट रोड, एपीएमसी, बच्छराज प्लॉट, चौधरी चौक, सिंधी चौक, राम लक्ष्मण संकुल या भागाची दुरूस्ती होणार आहे. शनिवार 31 मे ला 11 केव्ही एच. टी. फिडर वरील डफरीन रुग्णालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, शासकीय तंत्र निकेतन, जिल्हा क्रीडा संकुल, सांस्कृतिक भवन येथील वीज बंद राहणार आहे.
रविवार 1 जुन ला 11 केव्ही रेल्वे स्टेशन फिडरवरील देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने या फिडरवरील जिल्हा सामान्य रुग्णालय, खापर्डे बगीचा, समाधान नगर, होली क्रॉस, रेल्वे स्टेशन रोड, बस स्थानक, काझी कंपाऊंड, बस स्टँड रोड या भागाचा वीज पुरवठा बंद राहणार आहे. तसेच सोमवार 2 जुन रोजी 11 केव्ही एलआयसी फिडर दुरूस्तीसाठी हाती घेणार असल्याने अशोक नगर, एलआयसी ऑफिस, गौतम नगर, रामपुरी कॅम्प, भीम नगर, सिद्धार्थ नगर, सिव्हिल लाइन या भागाचा आणि मंगळवार 3 जुनला 11 केव्ही मोरबाग वाहिनीअंतर्गत येणार्या भागात वीज पूरवठा बंद ठेवण्यात येईल.
देखभाल दुरूस्तीची कामे ही वीज ग्राहकांच्या हिताची आहेत. देखभाल दुरूस्तीची कामे ग्राहकांच्या सोयीनुसार एरीया निहाय टप्प्या-टप्प्याने घेण्यात आली आहे. सकाळी 7 ते 1 वाजेदरम्यान वीज पुरवठा बंद राहणार असल्याने त्या-त्या एरीयातील ग्राहकांनी आपले नियोजन त्यादृष्टीने करावे, असे आवाहन शाखा अभियंता विनायक वाडवे यांनी केले आहे.