मान्सुनपुर्व वादळाने नुकसान झालेल्या पार्डी (देवी) गावाची पाहणी

अंजनगाव बारी /29 मे : आ. रवी राणा यांच्या मार्गदर्शनात पार्डी (देवी) गावात झालेल्या वादळाने नुकसानीची युवा स्वाभिमान पक्षा तर्फे पाहणी करण्यात आली. तसेच तलाठी यांनी नुकसान घरांची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. त्यावेळी उपस्थित तलाठी नरेंद्र लोथे , ग्रामपंचायत अधिकारी ओम पिहुलकर, युवा स्वाभिमान पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तसेच ग्रामपचांयत सदस्य उमेश डकरे,
पार्डी (देवी) सरपंच अक्षय मेश्राम सरपंच , उपसरपंच प्रतिभा बनसोड, पोलीस पाटील नितीन बेंडे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल राऊत, अजाब गंगात्रे, जितेंद्र भस्मे, प्रवीण टवलारे , महेंद्र भस्मे , देवलाल ढेंबरे , नारायण करमोरे आदी उपस्थित होते.

मेधगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसामुळे पार्डी ( देवी ) येथील नागरिकांच्या घरावरील टिनाची छपरे उडाल्याने मोठे नुकसान झाले असुन नुकसानीची पाहणी करुन याचा पाठपुरावा आ.रवी राणा यांच्याकडे करून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
-उमेश डकरे, तालुका उपाध्यक्ष, युवा स्वाभिमान पक्ष

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button