कुर्हा येथे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) रविराज देशमुख यांचा सत्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मनकीबातचे थेट प्रक्षेपण

कुर्हा/25 मे: येथील सांस्कृतिक भवन येथे सकाळी साडे दहा वाजता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मनकीबातचे थेट प्रक्षेपण रविराज देशमुख (जिल्हाध्यक्ष भाजपा अमरावती ग्रामीण तथा प्रदेश उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र) यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
याप्रसंगी कुर्हा ग्रामपंचायत सरपंच सौ.मिनाताई सुनिल नायर यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ग्रामीण रविराज देशमुख यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच उपसरपंच सलीम खॉ पठाण व सर्व सदस्य गण यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.आणि याप्रसंगी रविराज देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वर्हा येथील गणेश कामडी,उमेश श्रीखंडे, बाबाराव राऊत, राजेश नेवारे, ज्योत्स्ना इखार, अनिता जयतवार, नरेश वाडी, सतिश डहाके, अशोक पवार, संजय इंगोले,राजू लिल्हर्वे, अनुग्रह नायर, योगेश इंगोले इतर सर्व नागरिक उपस्थित होते.