मित्राचे भांडण सोडविण्यास गेलेल्या इसमास शिविगाळ करुन मारहाण
आरोपीविरुद्ध गुन्हा

वरुड । 11 जून– मित्राचे भांडण सोडविणेकरीता गेले असता फिर्यादीला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना नुकतीच शहरातील केदार चौक परिसरात घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नमुद घटनावेळी व ठिकानी यातील नमुद आरोपी जय ओंकारेश्वर वडस्कर (22), रा.पार्डी रोड वरुड हा फिर्यादी शहजाद शब्बीर खॉन पठाण (33) रा.गव्हाणकुंड याचे मित्र रिशाद रफिक खॉन यांचेसोबत वाद सुरु असता फिर्यादी शहजाद हे त्यांचे भांडण सोडविणेकरीता गेला असता नमुद आरोपी जय याने फिर्यादी शहजाद याचे उजवे कानावर बुक्की मारली व शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी शहजाद शब्बीर खॉन पठाण (33) रा.गव्हानकुंड यांच्या तक्रारीवरुन वरुड पोलिसांनी आरोपी जय ओंकारेश्वर वडस्कर (22), रा.पार्डी रोड वरुड याचे विरुद्ध 117 (2), 352, 351 (2) (3), भा.न्या.संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरुड पोलिस करीत आहे.