महावितरण अचलपूर विभागातर्फे ’रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन
विद्युत सुरक्षेचे जनजागृतीसाठी उल्लेखनीय उपक्रम

अचलपूर /2 जून: महावितरण अचलपूर विभागातर्फे आज ’विद्युत सुरक्षा सप्ताह’ निमित्ताने ’रन फॉर सेफ्टी’ या मॅरेथॉन धावण्याचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिक व कर्मचार्यांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता.
ही मॅरेथॉन आज सकाळी ठीक 7 वाजता महावितरण कार्यालय परिसर, अचलपूर येथून कार्यकारी अभियंता श्री प्रदीप अंधारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, कर्मचारी व नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमास अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री संजय कुटे, उपकार्यकारी अभियंता श्री तुषार गांजरे (अचलपूर कॅम्प उपविभाग), श्री मनोज टवळारकर (अचलपूर सिटी 1 उपविभाग), श्री संजय दातीर (चिखलदरा उपविभाग) यांच्यासह सर्व उपविभागांतील अधिकारी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मॅरेथॉनद्वारे विद्युत सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विजेचा सुरक्षित वापर हा वैयक्तिक तसेच सामाजिक सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे, याचा संदेश धावपटूंनी मार्गक्रमण करत असताना नागरिकांपर्यंत पोहोचविला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कार्यकारी अभियंता श्री प्रदीप अंधारे यांनी सांगितले की, महावितरणकडून 1 जून ते 6 जून दरम्यान ’विद्युत सुरक्षा सप्ताह’ साजरा केला जात आहे. या कालावधीत ग्राहकांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वसुंधरा दिन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच महावितरणच्या कर्मचार्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरक्षेची योग्य पातळी राखत काम कसे करावे यासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. नागरिकांनी विजेच्या उपकरणांचा वापर करताना योग्य ती काळजी घ्यावी, कोणतीही बेपर्वाई करू नये, असे आवाहनही श्री अंधारे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे: सहायक अभियंते: हर्षपाल सावतकर, रोहित मस्के, ठाकरे मॅडम, राजेश मिसूरकर,नीलेश शिंदे, मनोज सरदार, राजेश गावळी, गौरव निस्ताणे, निलेश रोटे उपव्यवस्थापक: राजेश तिवारी, नीलेश मानकर अन्य कर्मचारी व अधिकारी: सचिन नलकांडे, पवन सातपुते, सतीश चोपडेकर, सुशील साव, गौरव खओले, पंकज माहूलकर, बिस्मिल्लाह शाह, सचिन ठाकरे, शेख साजिद, नंदकुमार वानखडे (मीटर रीडर) आदींची उपस्थिती होती. हा उपक्रम महावितरणच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतिक असून, विद्युत सुरक्षा विषयक जनजागृतीसाठी करण्यात आलेली ही स्तुत्य पायरी सर्व स्तरांमध्ये कौतुकास पात्र ठरली आहे.