महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात रक्षाबंधनाचा अभिनव उपक्रम
मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांचा पुढाकार

अमरावती/8 ऑगस्ट : अमरावती महानगरपालिकेने रक्षाबंधनाच्यापोर्शभूमीवर अग्निशमन विभागातएक अभिनव उपक्रम राबवून
समाजात बांधिलकी आणिकृतज्ञतेचा अनोखा संदेश दिला.या उपक्रमांतर्गत महानगरपालिकाआयुक्त सौम्या शर्मा चांडक,
अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक,उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी अग्निशमन कर्मचार्यांनाराखी बांधून त्यांच्याप्रतीकृतज्ञता व्यक्त केली.महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्यामार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. अग्निशमन विभागातीलअधिकारी व जवान जे जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवतात, त्यांच्या कार्याला मान्यता देत, त्यांना ‘राखी’ बांधून समाजाने त्यांचे ऋण मान्य केल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.यावेळी महिलांनी अग्निशमनदलातील कर्मचार्यांना राखी बांधून फुलं, मिठाई व शुभेच्छा दिल्या.कर्मचार्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत, नागरिकांच्यासुरक्षेसाठी नेहमी तत्पर राहण्याची ग्वाही दिली. या उपक्रमामुळेसमाजातील सुरक्षादूतांप्रती असलेली आदरभावना अधिक दृढझाली असून, भविष्यात अशाउपक्रमांद्वारे सामाजिक सलोखाआणि सद्भावना वृद्धिंगत होईल,असा विेशास आयुक्तांनी व्यक्तकेला. आयुक्त सौम्या शर्मा चांडकम्हणाल्या, अग्निशमन विभागातीलकर्मचारी हे केवळ आपत्तीच्यावेळीच नव्हे, तर नेहमीचसमाजाच्या रक्षणासाठी सज्जअसतात. रक्षाबंधनाचा खरा अर्थम्हणजे परस्पर रक्षणाची भावना.अग्निशमन कर्मचार्यांना राखीबांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्तकेली, ही बाब अत्यंत भावस्पर्शीहोती. अशा उपक्रमांमुळेसमाजातील सलोखा आणिआपल्या सेवा विभागाबद्दलचाआदर वाढतो. यावेळी मुख्यअग्निशमन प्रमुख लक्ष्मण पावडे,वैद्यकीय आरोग्य अधिकारीडॉ.विशाल काळे, वैद्यकीयअधिकारी डॉ.अजय जाधव,सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर,सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे,पशुशल्य चिकीत्सक डॉ.सचिनबोंन्द्रे, बाजार परवाना विभागाचेसहाय्यक आयुक्त दिपक खडेकार,उदय चव्हाण, अग्निशमनअधिक्षक संतोष केंद्रे, सैयदअनवर, सहाय्यक प्रकल्पसंचालक वंदना गुल्हाणे, जेष्ठस्वास्थ निरीक्षक विजय बुरे,
अग्निशमन विभागाचे कर्मचारी,मनपा कर्मचारी उपस्थित होते.




