पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज दौरा

अमरावती /30 मे: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवार, दि. 31 मे रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत.
दौर्यानुसार, श्री. बावनकुळे दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पारधी बांधवांना ट्रॅक्टर आणि ऑटो वाटप कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत लाभार्थ्यांना जीवनसहायक उपकरण वितरण शिबिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहतील.