पत्नीचा पती आणि त्याच्या प्रेयसीवर प्राणघातक हल्ला

दोन भावांच्या मदतीने चाकूने वार

-दोघेही गंभीर, फ्रेजरपूरातील घटना
अमरावती / 14 मे: कुटुंबाला सोडून अन्य समाजाच्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या व्यक्ती व त्याच्या प्रेयसीवर त्याच्या पत्नीनेच आपल्या दोन भावांच्या सहकार्याने प्राणघातक हल्ला चढविला. ही घटना फ्रेजरपूरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. दोघांवर चाकूने वार करण्यात आल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले. सैय्यद अजीम उर्फ अज्जू सैय्यद सालार (38, बिच्छु टेकडी) व त्याच्या प्रेयसीला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सैय्यद अजीमची पत्नी आणि दोन साळे शेख हारुण शेख हसन (34) व शेख सलमान शेख हसन (32) यांच्यावर फ्रेजरपूरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार सैय्यद अजिम याचा विवाह झाला आहे. त्याचे कुटुंब बिच्छु टेकडी परिसरात राहते. तरीही त्याचे एका एका अन्य समाजाच्या महिलेसोबत प्रेम संबंध आहे. काही दिवसांपासून तो या महिलेसोबत फे्रजरपूरा परिसरात रिलेशनशिपमध्ये राहतो. त्यामुळे सैय्यद अजिम आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत भांडणे होत होती. त्यातूनच काल मंगळवारी सैय्यदची पत्नी आपले दोन भाउ शेख हारुण आणि शेख सलमान यांच्यासह सैय्यद जेथे महिलेसह राहतो त्या घरी पोहोचली. यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. एकमेकांना शिवीगाळ केली जात असताना सैय्यदची पत्नी आणि तिच्या दोन भावंडांनी सैय्यद व त्याच्या प्रेयसीला मारहाण सुरु केली. याचवेळी त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले.
या हल्ल्यात दोघेही गंभीररीत्या जखमी होवून रक्ताच्या थारोळ्यात पडले. घटनेनंतर हल्लेखोर तिघेही तेथून पसार झाले. शेजार्‍यांनी दोन्ही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. माहिती मिळाल्यानंतर फ्रेजरपूरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला. जखमींचे बयाण नोंदवून तिन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. काही तासांतच पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास फ्रेजरपूरा पोलिस करित आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button