शेतकरी उमेश राठोड पुरस्काराने सन्मानित

अमरावती /29 मे: कापूस शेतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल काटी गावाचे प्रगतशील शेतकरी उमेश राठोड यांना महाधन योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना, काटी गांवात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास स्थानिक शेतकरी बंधू, तसेच एमएएल अधिकारी उपस्थित होते.या वेळी उमेश राठोड, पुरस्कारप्राप्त शेतकरी म्हणाले,महाधन खत वापरल्यानंतर माझ्या कपाशी पिकात लक्षणीय फरक जाणवला. झाडे अधिक सशक्त झाली, फांद्या वाढल्या आणि बोंडांची संख्याही अधिक होती. बोंडांचे वजनही वाढले आणि उत्पादनात सुमारे 15 टक्के वाढ झाली. यामुळे माझे उत्पन्न वाढले आणि संतुलित पोषण तसेच प्रगत शेती पद्धतींवरचा विश्वास अधिक दृढ झाला.श्री. नरेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की,श्री.उमेश राठोड यांच्यासारख्या शेतकर्‍यांना बळ देणे हीच आमची खरी कामगिरी आहे. आमचं उद्दिष्ट म्हणजे शेतीत उत्पादकता, नफा आणि शाश्वतता वाढविणं.महाधन योद्धा पुरस्कार हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेती करणार्‍या प्रगतशील शेतकर्‍यांच्या सन्मानाचे प्रतीक आहे आणि महाराष्ट्रभर अशा शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याच्या कार्याला अधोरेखित करतो.

संबंधित बातम्या

Back to top button