प्रयत्नाची परकाष्टा केल्याशिवाय अपेक्षित यश मिळत नाही
निलेश जामठे यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे हरम येथील उन्नती ढाकरेचा सत्कार
अमरावती/28 मे-अपेक्षित यश मिळवण्याकरता प्रयत्नाची परकाष्टा केल्याशिवाय ध्येयपूर्ती होत नाही. विद्यार्थी जीवन हे शिस्तबद्ध व आज्ञाधार्य असावे स्पर्धेच्या युगात प्रत्येकाने मेहनतीची काच धरावी शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासाचे धडे नियमितपणे अभ्यासले तर कठीण काहीच नसते मात्र त्याकरिता अभ्यासाची (कष्टाची) तयारी अत्यावश्यक असते असे विद्यार्थी जीवनात प्रेरणादायी विचाराची पेरणी जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांनी केली.
अचलपुर तालुक्यातील हरम येथील संदिप ढाकरे यांची मुलगी कु.उन्नती ढाकरे हिने वर्ग 10 वी मध्ये 88 टक्के गुण मिळाल्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशाने तिचा शाल,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,संत रविदास महाराज पुस्तिका व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाध्यक्ष निलेश जामठे,तालुका अध्यक्ष मनोहर कोथळकर,योगेश रेवसकर,दिलीप तायडे,रामा लाहाडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी कैलास गौळसुदरे,सरपंच प्रकाश ठाकरे,माजी सरपंच मंगेश भोरे,ग्रा.प.सदस्या सौ.ज्योती ढाकरे,अशोक ढाकरे,संदीप ठाकरे,सपना ढाकरे,देवराव ढाकरे,सुमित्राबाई ढाकरे,प्रणव ढाकरे,रोहित ढाकरे,सोहम ढाकरे,गजानन ठाकरे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.