संपादक अनिल अग्रवाल यांनी केला कथा व्यास संजयकृष्ण महाराजांचा सत्कार
धामणगावात सुरु आहे 7 दिवसीय भागवत कथा

-माहेश्वरी व राजस्थानी समाजातर्फे आयोजन
अमरावती / 21 जुलै : धामणगाव रेल्वे येथील माहेश्वरी परिवार व राजस्थानी परिवाराच्या संयुक्त विद्यमाने शहरात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. प. पू. कथा व्यास संजयकृष्णजी महाराज हे भागवत कथेचे वाचन व निरुपण करित आहेत. दरम्यान काल राजस्थानी हितकारक मंडळाचे अध्यक्ष आणि दै. अमरावती मंडल व दै. मातृभूमिचे संपादक अनिल अग्रवाल आणि मंडळाचे सचिव रामेश्वर गग्गड यांनी कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. यावेळी राजस्थानी समाजबांधवांच्या वतीने अनिल अग्रवाल यांच्या हस्ते कथा व्यास संजयकृष्णजी महाराज यांचा दुशाला अर्पण करुन व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. अनिल अग्रवाल यांनी यावेळी महाराजांचे आशिर्वाद घेतले.
यावेळी राजस्थानी हितकारक मंडळाचे सचिव रामेश्वर गग्गड यांच्यासह राजस्थानी हितकारक मंडळाचे धामणगांव रेलवे तालुका अध्यक्ष अशोक मुंधडा, तालुका सचिव लक्ष्मीनारायण चांडक, महिलाध्यक्ष राधा भूत, महिला सचिव जयश्री राठी, माहेश्वरी महिला मंडळाच्या तालुका अध्यक्षा सारिका राठी व सचिव सुनिता मुंधडा तसेच प्रणय अनिल अग्रवाल (अमरावती) प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच धामणगाव रेल्वे शहर आणि तालुक्यातील भाविकांची कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यांच्याकडून प्रसन्न वातावरणात भागवत कथेचे श्रवण करण्यात आले.
राजस्थानी व माहेश्वरी समाजाने एकत्रितपणे या धार्मिक कार्यक्रमाचे सुरेख आयोजन केल्याबद्दल राजस्थानी हितकारक मंडळाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी समाधान व्यक्त केले. राजस्थानी समाजातील व्यक्तींनी असेच एकजुटीने कार्य करणे, ही आजची गरज असल्याचे अनिल अग्रवाल म्हणाले. त्या दिशेने धामणगाव रेल्वे येथील राजस्थानी समाज अग्रेसर आहे, असे सांगून अग्रवाल यांनी आनंद व्यक्त केला. याचप्रकारे येणार्या काळात जैन समाज, अग्रवाल समाज, ब्राह्मण समाज आणि सोनार समाजाला आपल्याशी जोडून धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात समर्पण भावनेने सेवा कार्य केले जावे, अशी अपेक्षा अनिल अग्रवाल यांनी व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन संजय जांगडा व शुभम इंदानी यांनी केले. यावेळी सर्वश्री गोपाल भूत, प्रेमचंद मुंधडा, दिनेश शर्मा, हरगोविंद मुंधडा, लक्ष्मीनारायण चांडक व ओमप्रकाश इंदानी यांच्यासह धामणगांव रेलवे परिसरातील माहेश्वरी व राजस्थानी समाजबांधव उपस्थित होते. महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती.




