दुचाकीची महिलेला जबर धडक: महिलेचा मृत्यू.

तिवसा शहरातील घटना

तिवसा /20 मे: महामार्ग ओलांडत असताना भरधाव दुचाकीची महिलेला जबर धडक बसल्याने 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दि 20रोजी दुपारी 1वाजता दरम्यान तिवसा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर घडली. सौ.वत्सला सुधाकर वाघाडे, रा धामंत्री असे अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.
शहरातील मंगळवार हा बाजाराचा दिवस असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गर्दी बाजार पेठेत असते.मृतक सौ.वत्सला वाघाडे या बाजार करून महामार्गा ओलांडून आटोच्या दिशेने जात असताना समोरून येणार्‍या भरधाव दुचाकीने महिलेला जबर धडक दिली.ज्यात महिलेच्या डोक्यासह हात पायाला गंभीर दुखाप्त झाली. यावेळी उपस्थिती काही नागरिकांनी महिलेला जखमी अवस्थेमध्ये तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले,परंतु महिलेच्या डोक्यातून रक्तस्रोत जास्त झाल्याने तातडीने अमरावती हलविण्यात आले मात्र वाटेतच महिलेचा मृत्यू झाला. अपघातातील दुचाकीस्वार दुचाकीसह घटना स्थळावरून पसार झाला असून वृत्तलिहोस्तर गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

मृतक सौ.वत्सला सुधाकर वाघाडे यांच्या मुलाचा चार दिवसापूर्वीच विवाह झाला.त्यामुळे घर खर्चासाठी त्या आज तिवसा येथे बँकेतील पैसे काढण्यासाठी आल्या होत्या.घरी मुलाच्या विवाहाचा मंडप काढत नाही तेच आईच्या मृत्यूच्या घटनेने वाघाडे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button