डॉ.सोनवणे दांपत्य यांचे व्याख्यान संपन्न

महाराष्ट्र होमिओ डॉक्टर्स असोसिएशन अमरावती तर्फे

अमरावती /20 मे: महाराष्ट्र होमिओ डॉक्टर्स असोसिएशन अमरावती अंतर्गत रविवार दिनांक 18/05/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता हॉटेल ग्रेस इन येथे श्री.साईबाबा हॉस्पिटल अंबापेठ,अमरावती चे संचालक डॉ.भुषण सोनवणे(एमडी मेडिसिन,डियम कार्डीयॉलॉजि)व डॉ.मोनाली निस्ताने (एमडी मेडिसिन,डियम गॅस्ट्रॉएंटरयॉलॉजि)यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.व्यासपीठावर संघटनेचे 2025चे अध्यक्ष डॉ.अशोक उमप,व्याख्याते डॉ.भुषण सोनवणे व डॉ.मोनाली निस्ताने,पूर्वाध्यक्ष फोरम अध्यक्ष डॉ.सुरेंद्र काळबांडे,आय.पी.पी.डॉ.राजीव रोडे,सचिव डॉ.विपुल भट्टड,लेडीविंग चेअर पर्सन डॉ.पल्लवी चौधरी,प्रकल्प प्रमुख डॉ.शितल आचार्य यांची उपस्थिती लाभली.
सर्वप्रथम डॉ.सॅम्युअल हॅनिमन यांच्या प्रतिमेला हार,पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरवात करण्यात आली.या कार्यक्रमाच्या प्रकल्प प्रमुख डॉ.शितल आचार्य यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केला.सहप्रकल्प प्रमुख डॉ.संदीप बुटे यांनी त्यांना सहकार्य केले.या सुंदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ. वैशाली टेम्भे व डॉ.विकी पिंजानी यांनी केले.तसेच व्याख्यात्यांचे परिचय पत्रक वाचन डॉ.अभिजित रंगे व डॉ.स्नेहा पिंजानी यांनी केले.अमरावती शहरातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.भुषण सोनवणे यांनी हायपरटेंशन अँड ईट्स मॅनेजमेंट या विषयावर तर सुप्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ.मोनाली निस्ताने यांनी युजिआय ब्लीड अँड ईट्स मॅनेजमेंट या विषयावर सिएमई मार्फत अत्यंत सोप्या पद्धतीने विस्तृत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुंदर असे आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव डॉ.विपुल भट्टड यांनी केले.सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेऊन हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाला संघटनेचे पूर्वाध्यक्ष डॉ.धीरज चितलांगे,डॉ.गजानन राऊत,डॉ.पुरुषोत्तम झंवर,डॉ.विकास निनावे,डॉ.विवेक पिहूलकर, डॉ.एम.ए.नईम,डॉ.बी.एन.राठी,डॉ.आशिष धर्माळे,डॉ.संजय कथलकर,जेष्ठ सदस्य डॉ.बाबुराव निंभोरकर,डॉ.नंदकिशोर भुताडा,डॉ.गेमनानी,डॉ.प्रदीप लढा,डॉ.विलास मोडक,उपाध्यक्ष डॉ.स्वाती पडोळे,डॉ.मनोज चौधरी,डॉ.हमीद अली,डॉ.जयंत भोसले,माजी लेडी विंग अध्यक्षा डॉ.शितल चौधरी,डॉ.दिपाली कपूर,डॉ.अल्का राजपुरीया,लेडी मेम्बर्स डॉ.प्रांजली जोशी,डॉ.माया इंगळे,डॉ.स्मिता सांबे,डॉ.प्रिया खार्वे,डॉ.ऋग्वेदा गावंडे,डॉ.श्रद्धा घरडे,सदस्य डॉ.राहुल कोवळे,डॉ.गजानन कुंभलकर,डॉ.मनोज चिठोरे व सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.असे महाराष्ट्र होमिओ डॉक्टर्स संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख डॉ.संदीप बुटे यांनी कळवले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button