युपीएसी परीक्षेत निवड झालेल्यांचा सत्कार
जनसमृदधी ग्रामविकास संस्था, विष्णोरा यांचे आयोजन

मोर्शी /5 जून: तालुक्यातील विष्णोरा येथे 1 जून,2025 ला स्व.गजाननराव चरपे (उद्योजक, पुणे) यांच्या 7 व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून जनसमृधी ग्रामविकास संस्था, विष्णोरा यांचे सौज्यन्याने गावातील शासकीय सेवेत निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये युपीएसीव्दारे खान मंत्रालयात वर्ग 1 पदावर निवड झालेले गोपाल डवरे, आरोग्य सेवेत अधिपचारिका पदी निवड झालेली भाग्यश्री नागले, इंडियन आर्मिमध्ये अग्नीवीर पदी निवड झालेल्या प्रज्वल ठाकरे तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत सहाय्यक तंत्रज्ञपदी निवड झाले त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच गावातील 10 वी 12 वीत उत्तीर्ण सर्वच विद्यार्थाचा स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ व शतावरीचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व गावच्या सरपंचा सौ.कल्पना चरपे यांचे हस्ते अभिजित देशमुख, समुपदेशक, व्यवसाय मार्गदर्शक, शिवाजी बहुउद्देशीय शाळा, अमरावती यांचा शॉल व पुष्पगुच्छा देवून सत्कार करण्यात आला.अभिजित देशमुख यांनी संस्थेच्या कार्याचे व गावाचे कौतूक केले. सर्वप्रथम स्व.गजाननराव चरपे यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात येवून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मंचकावरील केशवराव ठाकरे, अशोकराव कविटकर, रामेश्वर चरपे यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन संघराज नागले यांनी तर प्रास्ताविक संस्थेचे सचीव चंद्रशेखर चरपे यांनी केले.आभारप्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर डवरे यांनी केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी सुमंत चरपे, रविंद्र ठाकरे, माजी सरपंच बाळासाहेब ठाकरे, अण्णासाहेब चरपे, बाळासाहेब ढोमणे, रावसाहेब चरपे व गावातील पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी दिनेश ठाकरे,अंकीत चरपे, सुमित नागले, अभिजित चरपे, सुरज आठवले, बुध्दभूषण तंतरपाळे, भैय्या चांदूरकर, शिवा ठाकरे, वैभव ठाकरे,साहील लांडगे, धिरज डवरे, अमित कथले, सर्वेश दंवडे यांनी सहकार्य केले.