शारीरिक अत्याचारातून बालिकेला गर्भधारणा

आरोपीवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

अमरावती / 14 मे: 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका 24 वर्षीय युवकाने सतत अडिच महिने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यातून या युवतीला गर्भधारणा झाल्यानंतर घटना उघडकीस आली आणि पिडितेच्या आईने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपीवर बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विनय शिष्टे असे आरोपीचे नाव आहे.
मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील रहिवासी असलेल्या विनयने 1 डिसेंबर 2024 ते 14 फेब्रुवारी 2025 असे अडिच महिने या अल्पवयीन युवतीवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले. सुरुवातीला मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी अत्याचारातून मुलीला गर्भधारणा झाली. कुटुबियांनी वैद्यकिय तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पिडित मुलीने संपूर्ण हकीकत कुटुबियांना सांगितली. मुलीच्या आईने याबाबत मोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विनय शिष्टेवर गुन्हा दाखल केला.

संबंधित बातम्या

Back to top button