टाकरखेडा संभू येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर
165 लाभार्थ्यांनी घेतला लाभ

टाकरखेडा संभू /30 मे : आ.राजेश वानखडे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर महसूल मंडळ पूर्णा नगर अंतर्गत टाकरखेडा संभू ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आले. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या समस्या, तक्रारी आणि अर्ज सादर केले. अनेक प्रलंबित प्रकरणांना या निमित्ताने मार्ग मिळाला. शिबिरात विविध उपक्रमाचा 165 लाभार्थ्यांनी घेतला लाभ
या शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, सामाजिक कल्याण आदी विभागांच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहून कार्य तत्परतेने पार पाडण्यात आले.
शिबिरात प्रामुख्याने रहिवाशी, उत्पन्न, जात प्रमाणपत्रे, रेशन कार्ड वाटप, पीएम किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, घरकुल लाभार्थ्यांना रेती रॉयल्टी प्रमाणपत्र, जिवंत सातबारा, फेरफार नोंदी, कृषी व आरोग्य योजनांचा लाभ असे अनेक कामकाज पार पडले. तसेच आरोग्य विभागामार्फत पाच लाखांपर्यंत आरोग्य कार्ड देण्यात आले.शिबिरात मुख्य अतिथी म्हणून आमदार राजेश वानखडे, सरपंच रश्मी देशमुख, उपसरपंच प्रदीप शेंडे, नायब तहसीलदार कृष्णा गाडेकर, प्रभारी गट विकास अधिकारी प्रवीण वानखडे,भातकुली तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गौरखेडे, तालुकाध्यक्ष श्याम गवळी, माजी तालुकाध्यक्ष सोपान गुडधे, मंडळ अधिकारी गौरव सुरपाटने , ग्राम महसूल अधिकारी जयश्री भुयार टाकरखेडा संभू ग्रामपंचायत सदस्य दिलीप म्हसके, सोनाली जामठे, प्रीती पाटील , ग्राम विकास अधिकारी लक्ष्मण ठाकरे पूर्णा नगर मंडळाचे महसूल अधिकारी व ग्रामसेवक संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान व प्रभावी होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले. प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ निर्णय घेण्यात आला आणि सर्व अधिकार्यांना तत्पर सेवा देण्याच्या सूचना दिल्या गेल्या.
शिबिरातील महत्त्वाचे लाभ रहिवाशी, उत्पन्न, जात प्रमाणपत्र वाटप रेशन कार्ड नविन/नाव नोंदणी/काढणे पीएम किसान, संजय गांधी, श्रावण बाळ योजनांचा लाभ घरकुल लाभार्थ्यांना रेती रॉयल्टी प्रमाणपत्र जिवंत सातबारा व फेरफार नोंदी निकाली कृषी सल्ला व योजनांचा मार्गदर्शन 5 लाखांपर्यंतचे आरोग्य कार्ड वितरित