महेश नवमी निमित्त मोर्शीमध्ये रक्तदान शिबिर संपन्न
शिबिरात 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान

मोर्शी /4 जून–महेश नवमीचे औचित्य साधून मोर्शी तालुक़ा माहेश्वरी संगठन, मोर्शी तालुक़ा माहेश्वरी नवयुवक संघठन, मोर्शी तालुक़ा माहेश्वरी महिला संगठन व रक्तदान संघ मोर्शीच्या वतीने येरला येथील शिवमंदिरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.याप्रसंगी कोमल झंवर राधिका साबू मीनल चित्तलागे रूपाली चांडक या महिलांनी रक्तदान करून आपले सामाजीक दायित्व निभावले.प्रवीण पालीवाल रा.मेनपुरी उत्तरप्रदेश यांनी 100 पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. रक्तदान शिबिर ही संकल्पना केवळ रक्तदानाच्या माध्यमातून समाजसेवा करणारी नसून देशासाठी लढणार्या सैनिकांना प्रेरणा देण्यासाठी, देशासाठी बलिदान देणार्या सैनिकांना आदरांजली वाहणारी आहे.यावेळी प्रवीण पालिवाल यांनी अनेक वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. दिवसेंदिवस जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे अनेक वेळा अपघात झाल्यास रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासते तसेच शस्त्रक्रिया करतांना रक्त मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. प्रसंगी मोठी किंमत देऊन रक्त विकत आणावे लागते. जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिरे कमी होत असल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अपघात घडल्यास वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णास प्राणास मुकावे लागते या गंभीर समस्येची दखल घेत. मोर्शी तालुक़ा माहेश्वरी संघटनेच्यावतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा रक्तदान संघाचे कोषाध्यक्ष डॉ.प्रमोद पोतदार, डॉ.सागर श्रीराव,बंटी नागले,कृष्णा वाघमारे,ज्योतिप्रसाद मालवीय, भूषण कोकाटे,अनिता लांजेवार,बाबाराव जाधव,अजय पाटील,शेखर चौधरी, संजय उल्हे,शरद कनेर उपस्थित होते. रुग्णालयाचे डॉ अविनाश उकंडे,डॉ गौरी जगताप,योगेश पानझडे, जयवन्त गावंडे,प्रवीण कळसकर, कांचन राऊत,सुजित वानखडे ही चमू उपस्थित होते. रक्तदान शिबिरा करता मोर्शी तालुका माहेश्वरी संघटनेचे राजेश राठी, उपाध्यक्ष उमेश मंत्री, सचिव सागर राठी, अमित बंग,गोविंद बाबूलालजी राठी, नंदकिशोर मंत्री, मधुसूदन बियाणी, महेश मुंधडा, मंगेश साबू नंदकिशोर मंत्री तसेच मोर्शी तालुक़ा माहेश्वरी नवयुवक संघठन व मोर्शी तालुक़ा माहेश्वरी महिला संगठन व रक्तदान समिती मोर्शीच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.