भाजपकडून शेकडो वृक्षांची लागवड

आईच्या नावाने एक झाड

* डॉ. नितीन धांडे यांच्या नेतृत्वात उपक्रम

* पालकमंत्री बावनकुळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद

अमरावती /5 जून: जागतिक पर्यावरण दिन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यावरण दिवसास 11 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त 5 जूनपासून 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ’आईच्या नावाने एक झाड’ ही मोहीम सुरू झाली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ एक झाड लावण्याचे आवाहन केले होते.
प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावले पाहिजे आणि त्याचे संगोपन केले पाहिजे. या पार्श्वभूमिवर भाजप शहर जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन धांडे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भाजपा कार्यकर्त्यांनी शेकडो झाडे लावून पालकमंत्री बावनकुळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
भाजपच्या वतीने लहानुजी महाराज गार्डन, नारायण नगर, महानगरपालिका शाळा क्रमांक 19 जवळ वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी परिसरामधील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. भाजपच्या समर्थनार्थ घोषणा देत वृक्ष लावण्यात आली. मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमात महिला देखील मोठ्या प्रमाणा सहभागी झाल्या होत्या. त्यांनी हिरव्या साड्या आणि ड्रेस परीधान करून वृक्ष लागवड अभियानात सहभाग नोंदविला. हा उपक्रम पुढील दोन महिने सुरू राहील. जिल्ह्यात 1 लाखाहून अधिक वृक्ष लावण्याचा आणि त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी माजी सभागृहनेते सुनील काळे, राजू कुरील, समन्वयक राधा कुरील, सहसंयोजक शीतल वाघमारे, माधुरी ठाकरे, भाग्यश्री देशमुख, गंगा खारकर, विवेकानंद मंडळाचे अध्यक्ष संतोष कावरे आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Back to top button