अमरावतीतून चोरी गेलेला ऑटो मोर्शीत हस्तगत

मोर्शी / 8 जुलै: काही दिवसांपूर्वी अमरावती शहरातून चोरी गेलेला ऑटो मोर्शी पोलिसांनी हस्तगत केला आहे. अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात या ऑटो चोरीच्या तक्रारीची नोंद आहे. मोर्शी पोलिसांना चांदुर बाजार मार्गावर हा ऑटो आढळून आला.
मोर्शी पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करित असतांना मोर्शी ते चांदूरबाजार रोडवर एक विनानंबरचा ऑटो संशयास्पदरित्या उभा असल्याची गोपनीय माहिती या पथकाला मिळाली. त्यावरून स्कॉड विभागाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, पो.कॉ.स्वप्निल बायस्कर, छत्रपती करपते यांनी घटनास्थळी जाऊन सदर ऑटो पोलीस स्टेशन येथे आणला. ऑटोचा चेचीस व इंजिन नंबरची तपासणी केली असता हा ऑटो पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा, अमरावती येथून चोरी गेलेला असल्याचे निष्पन्न झाले.
अमरावती येथील प्रसन्नजीत भाऊराव सरदार यांच्या मालकीचा हा ऑटो काही दिवसापूर्वी चोरी झाल्याची तक्रार त्यांनी फ्रेजरपूरा पोलीस स्टेशन येथे दिली होती. सदर ऑटो हा शहर हद्दीतून चोरी गेला असल्याने पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा यांचे ताब्यात देण्यात आला. ही कारवाई मोर्शीचे ठाणेदार सुरज बोंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, हे.कॉ स्वप्निल बायस्कर, छत्रपती करपते यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button