अमरावती तालुकाध्यक्ष पदी अनुज म्हस्के यांची नियुक्ती
अमरावती तालुकाध्यक्ष पदी अनुज म्हस्के यांची नियुक्ती

अमरावती /26 मे: उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या भरगच्च दौर्यानंतर बारा मे ला शिवसेना ओबीसी, व्ही.जे.एन.टी शिंदे गटाचे प्रदेशाध्यक्ष श्री.बाळासाहेब किसवे यांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन शासकीय विश्रामगृह अमरावती येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी अमरावतीचे सुप्रसिद्ध सूत्रसंचालन कार, गायक, सामाजिक कार्यकर्ते श्री अनुज म्हस्के यांची ओ.बी.सी,व्ही.जे.एन.टी शिंदे गटाच्या अमरावती तालुकाध्यक्ष पदी एकमताने नियुक्ती झालेली आहे.
यावेळी बोलताना अनुज म्हस्के म्हणाले की, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर वाटचाल करणार्या एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा विचार संपूर्ण अमरावती तालुक्यामध्ये पोहोचवायचा आहे. व शिवसेनेचा प्रचार प्रसार तळागाळापर्यंत करून समाजातील तरुणांना शिवसेनेमध्ये काम करण्याची संधी प्राप्त करून मराठी मने एकत्रित आणायची आहे.
यावेळी ओ.बी.सी,व्ही.जे.एन.टी सेना जिल्हाध्यक्ष डॉ. मेघशाम करडे, प्रकाश बोबडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयश्री शहाकार व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.